SBI Clerk Recruitment 2026: पदवीधरांसाठी सुवर्णसंधी; बँक भरतीची संपूर्ण माहिती

SBI Clerk Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे ज्युनिअर असोसिएट म्हणजेच क्लर्क (Clerk) पदांच्या तब्बल 9000 हून अधिक जागांसाठी मेगा भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. दरवर्षी लाखो तरुण या भरतीची आतुरतेने वाट पाहत असतात, आणि या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात पदभरती होत आहे.

तुम्ही जर पदवीधर असाल आणि बँकेत सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत महाराष्ट्रातील आणि देशातील इतर राज्यांमधील केंद्रांवर उमेदवारांची निवड केली जाईल.

या लेखामध्ये आम्ही तुम्हाला SBI Clerk Bharti 2026 संदर्भातील सर्व आवश्यक माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा फी, निवड प्रक्रिया, परीक्षा स्वरूप आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

SBI Clerk Recruitment 2026 In Marathi

तपशीलमाहिती
संस्थेचे नावस्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India – SBI)
भरतीचे नावएसबीआय क्लर्क भरती 2026 (SBI Junior Associate)
पदाचे नावज्युनिअर असोसिएट (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स – क्लर्क)
एकूण जागा9124
अर्ज पद्धतऑनलाईन (Online)
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत (महाराष्ट्र समाविष्ट)
वेतनजाहिरात पाहावी
अर्जाची सुरुवात११ ऑगस्ट २०२६
अर्जाची अंतिम तारीख31 ऑगस्ट 2026
अधिकृत वेबसाइटsbi.co.in / sbi.co.in/web/careers

SBI Clerk Recruitment 2026 पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
ज्युनिअर असोसिएट (Clerk – Customer Support & Sales)9124
एकूण9124 जागा

Eligibility Criteria पात्रता आणि निकष

शैक्षणिक पात्रता :

  • पदवी: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील (Art, Commerce, Science, Engineering, etc.) पदवी (Graduation) उत्तीर्ण असावी.
  • अंतिम वर्षाचे विद्यार्थी: जे विद्यार्थी पदवीच्या अंतिम वर्षात किंवा अंतिम सत्रात आहेत, ते देखील अर्ज करू शकतात. मात्र, नियुक्तीच्या वेळी पदवी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
  • स्थानिक भाषेचे ज्ञान: उमेदवार ज्या राज्यातून अर्ज करत आहेत, त्या राज्याची स्थानिक भाषा (उदा. महाराष्ट्रासाठी मराठी) वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : अर्जदारांचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादेतील सूट (सरकारी नियमांनुसार)

  • SC / ST उमेदवार: 05 वर्षे सूट (वयाची अट: 33 वर्षांपर्यंत)
  • OBC उमेदवार: 03 वर्षे सूट (वयाची अट: 31 वर्षांपर्यंत)
  • PWD (दिव्यांग) उमेदवार: 10 ते 15 वर्षे सूट
  • माजी सैनिक: नियमांनुसार अतिरिक्त सूट

अर्ज फी :

  • General / OBC / EWS: ₹.750/-
  • SC / ST / PWD / ESM: ₹.0/- (शुल्क नाही)
  • भरणा पद्धत: डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे ऑनलाईन पद्धतीने.

SBI Clerk Recruitment 2026 Salary Details

वेतनश्रेणी : Rs.24050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020-2340/7-57400-4400/1-61800-2680/1-64480.

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख११ ऑगस्ट २०२६
अर्जाची शेवटची तारीख३१ ऑगस्ट २०२६
प्रवेशपत्र परीक्षेच्या अगोदर 08 दिवस
पूर्व परीक्षासप्टेंबर २०२६
मुख्य परीक्षानोव्हेंबर २०२६

SBI Clerk Bharti 2026 Important Links

जाहिरात pdfयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

निवड प्रक्रिया

  1. पूर्व परीक्षा (Preliminary Exam): 100 गुणांची संगणकावर आधारित (CBT) परीक्षा असते. यामध्ये इंग्रजी, गणिते आणि बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न असतात.
  2. मुख्य परीक्षा (Mains Exam): पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. ही परीक्षा 200 गुणांची असते.
  3. स्थानिक भाषा चाचणी (Local Language Test): उमेदवाराने जर 10 वी किंवा 12 वी मध्ये स्थानिक भाषा (मराठी) शिकली असेल तर ही चाचणी घेतली जात नाही. अन्यथा भाषा चाचणी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
  • उमेदवाराची स्वाक्षरी (काळ्या शाईने)
  • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा (Thumb Impression)
  • स्वहस्ते लिहिलेले प्रतिज्ञापत्र (Handwritten Declaration)
  • शैक्षणिक कागदपत्रे (10वी, 12वी आणि पदवी गुणपत्रक)
  • जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास – Cast Certificate/EWS)
  • आधार कार्ड किंवा पॅन कार्ड (ओळखपत्रासाठी)

How To Apply अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम SBI च्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in/web/careers वर जा.
  • त्या ठिकाणी “Recruitment of Junior Associates 2026” या लिंकवर क्लिक करा.
  • “Click here for New Registration” या पर्यायावर क्लिक करून तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी नोंदवून रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
  • रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  • अर्जात विचारलेली सर्व वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अचूक भरा.
  • फोटो, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा आणि Handwritten Declaration अपलोड करा.
  • भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून घ्या (Preview).
  • तुमच्या वर्गानुसार अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करा.
  • अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवा.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मधील क्लर्क पदाची भरती ही बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. 9000 पेक्षा जास्त जागा उपलब्ध असणार असल्याने योग्य नियोजन आणि अभ्यासाच्या जोरावर तुम्ही ही परीक्षा नक्कीच उत्तीर्ण करू शकता. या पदामुळे तुम्हाला चांगल्या पगारासोबतच सरकारी बँकेत काम करण्याचा मान आणि सुरक्षितता देखील मिळते.

Leave a Comment